राज्य
पंढरपूर – टाकळी – कासेगाव – अनवली मार्गावरील टोल आजपासून बंद
पंढरपूर – पंढरपूर -टाकळी – कासेगाव – अनवली जिल्हा मार्ग 76 हा बीओटीमधून अशोक ब्रिजवेज या कंपनीने तयार केला होता. यावरील टोल आज १५ ऑगस्ट पासून बंद करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली.
जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर यांच्या आदेशानुसार वरील रस्त्यावरील पथ कर वसुली आजपासून बंद केली आहे. हा टोलनाका आता कुलूपबंद झाला आहे.