राज्य
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी सांगोला व बार्शी दौऱ्यावर
पंढरपूर – भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या मंगळवार १७ ऑगस्ट रोजी सांगोला येथे येत असून ते स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. यानंतर ते बार्शीत जाणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस मंगळवारी दुपारी दीड वाजता सांगोला येथे येत आहेत. ते नागपूरहून विमानाने पुण्यात येत असून तेथून वाहनाने सांगोला येथे येतील. तर दुपारी साडेचार वाजता ते बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे जाणार आहेत.