पंढरपूरची “खड्डेपूर” ओळख स्वखर्चाने पुसणाऱ्या “मनसे”च्या कामाचे नागरिक करतायेत कौतुक
पंढरपूर – पंढरपूर शहराची ओळख ही खड्डेपूर अशी झाली असून याचा सर्वाधिक फटका नागरिकांना व वाहनचालकांना होताना दिसतो. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चाने विविध मार्गांवरील खड्डे बुजविले व ते ही सिमेंट काॅंक्रिटकरणाने. याचे काम रात्रभर सुरू होते. मनसेकडून ही पंढरपूरवासियांना व भाविकांना दिवाळीची भेटच म्हणावी लागणार आहे.
शनिवारी दुपारी सुरू झालेली मोहीम रविवारी पहाटे थांबली. तर सकाळी कार्यकर्ते या काॅंक्रिटीकरणावर पाणी मारत होते. अनेक ठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे बुजविले गेल्याने नागरिकांमधून चांगल्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सत्ता नसतानाही धोत्रे यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेत हा स्तुत्य उपक्रम राबविल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत होते.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असले तरी नागरी चांगले रस्ते येथे नाहीत. दर्जाहिन कामांचा फटका भाविक व स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर दिलीप धोत्रे आवाज उठवत आहेत. आता तर त्यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले आहेत. दरम्यान याबाबत सोशल मीडियातही भरभरून कमेंटस येत आहेत. नागरिक आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत.