राज्य

अभिजित पाटील यांचा सांगोला कारखाना गाळपास सज्ज तर धाराशिवमध्ये बॉयलर अग्निप्रदीपन


पंढरपूर –  डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजित पाटील यांनी मागील महिन्यातच चालविण्यासाठी घेतलला बंद अवस्थेतील सांगोला कारखाना आता गाळपासाठी सज्ज झाला असून विक्रमी काळात जादा कामगार लावून याचे काम पूर्ण करण्यात ाले असून येथे मिल रोलरचे पूजन कष्ट करणार्‍या अकरा कामगारांच्या हस्ते तर धाराशिव कारखाना चोराखळी येथे आज बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. तेथील शेतकर्‍यांना ऊसदरापोटी प्रतिटन 136 रूपयांचा उर्वरित हप्ता व कामगारांना पंधरा दिवसाचा पगार जाहीर करण्यात आला आहे.


धाराशिव साखर कारखाना युनिट 4 सांगोला साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम सन 2021-2022 मध्ये घेत आहे. मिल रोलर प्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने सांगोला व पंढरपूर भागातील शेतकर्‍यांच्या उसाची सोय झाली आहे.  याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, रणजित भोसले, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सुहास शिंदे यासह जेष्ठ संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, विश्‍वंभर चव्हाण, संजय मेटकरी उपस्थित होते.
तर शनिवारी धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळीच्या 10 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभुळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. बॉयलर अग्निप्रदीपनावेळी कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, त्यांच्या पत्नी सौ.कविता चौगुले यांच्या हस्ते होमहवन पूजा करण्यात आली.
याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, विकास काळे, दीपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात यांची  उपस्थिती होती.
 मागील ऊसबिलाचा राहिलेला प्रतिटन 136 रुपये हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.तसेच कर्मचार्‍यांचीही दिवाळी गोड व्हावी याकरिता  15 दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी चोराखळीचे सरपंच खंडेराव मैदांड,  बाबा साठे, केजचे सुरेश पाटील, सरपंच चरणेश्‍वर पाटील, बाबासाहेब पाटील, पंढरपूरचे प्रा.तुकाराम मस्के, पोपट पवार, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम मोरे, उमेश मोरे, गणेश ननवरे,पोपट घाडगे, महेश जावळे, समीर शेख उपस्थित होते.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close