दहावी, बारावीतील अनुत्तीर्णाची ऑक्टोबरला पुरवणी परीक्षा :- वर्षाताई गायकवाड
हिंगोली प्रतिनिधी :- दहावी व बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांना पुरवणी परीक्षेची संधी देण्यात येणार असून ऑक्टोबर मध्ये परीक्षा घेण्याची बाब विचाराधीन असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना सह, अतिवृष्टी पंचनामे आदी बाबीचा आढावा घेतला, यावेळी त्या म्हणाल्या दहावीतील एक लाख 25 हजार तर बारावीतील एक लाख 80 हजार विद्यार्थी अनूतीर्ण झाले आहेत काहींना ATKT मुळे पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे मात्र अनेकांना तो मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांचे वर्ष जाऊ नये यासाठी पुरवणी परीक्षेचे नियोजन सुरू आहे ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.