विशेष
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये दुपारी चार पर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार , जिल्हाधिकारी यांचा आदेश जारी..काय सुरू…काय बंद पाहा
सोलापूर -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात अनलाँक प्रक्रिया सुरू होत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवार उद्या दि.७ जूनपासून निर्बंध शिथिल होत असून या संदर्भात दि.६ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकान रोज सुरु राहतील तर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवारी ती बंद असतील.