विशेष
पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची पुण्यात बदली, नवे अधिकारी कोण ? उत्सुकता

पंढरपूर – कोरोनाकाळात पंढरपूरकरांसाठी मोठे काम करणारे व विशेषतः युवकांमध्ये प्रसिध्द असणारे पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांची पुणे येथे बदली झाली असून ९ आँगस्ट सोमवारी त्यांना पदभार घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन प्रांताधिकारी कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. याविषयीच्या आदेशात याचा उल्लेख नाही. श्री. ढोले हे आता पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून रूजू होणार आहेत.
