Uncategorizedराज्य

अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या मुख्याधिकारीपदी पंढरीचे सुपुत्र
निशिकांत परचंडराव यांची नियुक्ती

अकलूज – नव्यानेच स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी निशिकांत परचंडराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत .
परचंडराव हे मूळचे पंढरपूर येथील रहिवासी असून पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात त्यांनी एम. ए. इंग्लिश पर्यंत शिक्षण घेतले आहे .सन २००१ च्या बॅचचे ते मुख्याधिकारी असून सन २०२० पासून ते मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत .

प्रचंडराव यांनी आज ( शुक्रवार ) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील , शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील , माजी सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील , जि प सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील , माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची भेट घेवून अकलूज शहराच्या विकासाबाबत चर्चा केली .
परचंडराव म्हणाले , अकलूज शहराच्या विकासाबाबत घरकुल योजना , पाणीपुरवठा योजना , घनकचरा व्यवस्थापन या विषयी सविस्तर चर्चा झाली . या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे . प्रथमतः प्रशासकीय व्यवस्थापन कामकाजात सुरळीतपणा राखणे , कर्मचारी आकृतिबंध व शहर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे .

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close