माता रूक्मिणी मूर्ती चरणांवर होणार पुन्हा वज्रलेप !
पंढरपूर – श्री विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असून श्री रूक्मिणी माता मूर्ती चरणाची मात्र झीज झाली आहे. यावर पुन्हा वज्रलेप करावा लागेल अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी दोन्ही मूर्तींच्या पाहणी नंतर दिली.
पंढरीच्या पांडुरंगाची व रखुमाईच्या मूर्ती प्राचीन असून यांची काही प्रमाणात झीज होत आहे. वर्षात लाखो भाविक येथे पदस्पर्श दर्शन घेत आहेत. यामुळे मागील वर्षी लॉकडाऊन काळात मंदिर बंद असताना श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया अर्थात वज्रलेप करण्यात आला होता. मात्र देवाचे दर्शन दोन वर्षे बंद असताना देखील पायावर दर्शन सुरू होण्यापूर्वीच रूक्मिणी मूर्तीच्या चरणाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे आढळून आले. याबाबत भाविकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान याबाबत मंदिर समितीने तातडीची बैठक घेवून पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना याबाबत पाहणीसाठी आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार श्रीकांत मिश्रा व त्यांच्या पथकातील अधिकार्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजता स्वयंभू मूर्तींची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना मिश्रा यांनी, श्री विठ्ठलाच्या मूर्तीची मागील वर्षी पाहणी केली होती. त्यावेळे प्रमाणे आज देखील मूर्ती चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर रूक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणाची झीज झाली असल्याचे मान्य केले. मात्र सदर चरण हे मूळ मूर्तीचे नाहीत. काही वर्षापूर्वी मूर्तीचे चरण अत्यंत झीजल्यामुळे या ठिकाणी नवीन चरण बसविण्यात आले होते. हे नवीन चरण व मूळ मूर्तीचे चरण एकरूप होवू शकले नसल्यामुळेच याची झीज होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.
सदर चरणावर पुन्हा वज्रलेप करण्याची गरज असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. याबाबत मंदिर समिती लवकरच बैठक घेवून याबाबत तारीख जाहीर करणार आहे. तसेच मूर्ती झीज झाल्याबाबतचा अहवाल येत्या दोन दिवसात समितीस सादर केला जाणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने विविध सूचना केल्या असून याची अंमलबजावणी होत आहे. मात्र गाभार्यातील ग्रानाईट काढणे, समान ताप