विशेष

Good News : उजनी पर्यटन विकास आराखडा राबणार, शंभर कोटींची तरतूद


पुणे – उजनी लाभक्षेत्रातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायास चालना मिळण्यासाठी महत्वाचा मानला जाणारा उजनी पर्यटन विकास आराखडा तपशीलवार सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असून यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली.
शुक्रवारी पुणे येथील विधान भवन येथे सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी पवार, कार्यकारी अभियंता उजनी लाभक्षेत्र, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी, उजनी पर्यटन विकास आराखडा सादर केला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, प्रस्ताव तपशीलवार दाखल करावा व यासाठी सुरुवातीस शंभर कोटी देण्याचे मान्य केले आहे.
पर्यटनामुळे उजनी लाभक्षेत्रातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायास चालना देणार्‍या सर्व धार्मिक तसेच कृषी पर्यटनास चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन विषय कौशल्यावर आधारित उद्योगाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये टूर्स, गाईड, वाहन व्यवसाय, बांधकाम, स्वयंरोजगार, स्वच्छता सेवा, प्लंबिंग, कृषी मालाला बाजारपेठ त्याचबरोबर उजनी परिसरातील ग्रामस्थांना स्वयंरोजगार प्राप्त होतील. त्याचबरोबर समूदाय आधारित संस्थांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण होणार आहे, असे आमदार संजय शिंदे यांनी सांगितले.
बरेच दिवसापासून पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठका घेतल्या होत्या. त्याला आता मूर्त स्वरूप सध्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामुळे झाले. अजित पवार यांनी प्रस्ताव मान्य करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुरी देण्याचे मान्य केले आहे.
उजनी जलाशयातील पक्षी वैभवमध्ये यामुळे भर पडणार आहे. तब्बल 230 पक्ष्यांच्या प्रजाती देशी-विदेशी पक्ष्यांचे स्थलांतर यानिमित्ताने जलाशयावरील पक्षी पर्यटनास देखील चालना मिळणार आहे. तसेच वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीज निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये क्लब वॉटर, लाईट हाऊस, आकर्षक पेडल बोर्ड इत्यादी बोटिंग संदर्भातल्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रात जे लोक येतात त्यांना उजनी सारख्या पर्यटन क्षेत्रातही वळविता येवू शकते.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close