देश

‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅलीत साडेआठ हजार जणांचा सहभाग


पंढरपूर –  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट  या कालावधीत  नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी विविध शासकीय कार्यलय, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था तसेच पदाधिकारी  यांच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह साडेआठ हजार जणांनी सहभाग नोंदविला.


या रॅलीत आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, डॉ.बी.पी.रोंगे तसेच माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनाचे  सदस्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्योने  सहभागी झाले होते. या रॅलीत 350 फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेवून  विद्यार्थ्यांनी तसेच सहभागी अधिकारी व पदाधिकारी यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यामुळे पंढरी नगरी , झांज पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी दुमदुमून निघाली.


शहरात विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील वातावरण चैतन्यमय झालेले पाहावयास मिळाले. रॅलीमध्ये तालुक्यातील  विविध शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच  महसूल, पोलीस, नगरपालिका, कृषी, पंचायत समिती, महावितरण या विभागाच्या एक हजार शासकीय अधिकारी ,कर्मचार्‍यांनी तर पदाधिकारी,  विविध समाजिक संघटनाचे पदाधिकारी, नागरिक  अशा 2500 जणांनी सहभाग नोंदविला.  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीची सुरुवात झाली. ती छत्रपती शिवाजी महाराज चौक, भादुले चौक, नाथ चौक, महाव्दार चौक, कालिका देवी चौक मार्गे येवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला.  यावेळी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. याप्रसंगी  तालुक्यातील सर्व नागरिकांनी  दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात  सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close