देश
वृत्तवाहिन्यांना नियम पाळण्याच्या प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांमधून हिंसा, अत्याचार, हत्या आदींची स्पष्ट दृष्य दाखवली जात आहे. यामुळे महिला आणि मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करत सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने वृत्तवाहिन्यांना चपराक लगावली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायद्यांतर्गत दिलेल्या प्रोग्राम कोडचे पालन करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.
वृत्तवाहिन्यांवरून अपघात, घातपातांचे जे व्हिडीओ दाखवले जातात, त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिंग केले जात नाही. असे दृष्य दाखवताना ते ब्लर करण्याचे नियम आहेत. मात्र, वृत्तवाहिन्यांकडून हे नियम पायदळी तुडवले जातात. अशी दृष्य सोशल मीडियावरून घेतले जातात, यामध्ये काहीही बदल केले जात नाहीत. यामुळे संपादकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचंही मंत्रालयाने सांगितले आहे.
