कर्नाटक – महाराष्ट्र समन्वय ! आलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले
विजयपूर – विजयपूर जिल्ह्यातील लालबहादूर शास्त्री जलाशय अर्थात आलमट्टी धरणातून बुधवारी रात्री पासून १ लाख २५ हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
कर्नाटकात आलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात महापुराचा धोका होऊ नये, म्हणून आलमट्टी धरणातून सुरुवातीला 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले होता. नंतर हा विसर्ग रात्री सव्वा लाख क्युसेक करण्यात आला.
आलमट्टी धरणात 1लाख 75 हजार 473 क्युसेकने पाणी येत होते. महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने परस्पर चांगला समन्वय ठेवल्यामुळे आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवून पुराचा संभाव्य धोका टाळण्यात आला आहे.
५१९.६० मीटरचा उंचीच्या आलमट्टी धरणात ५१७.२३ मी. पाणी संग्रह करण्यात आले असून, १२४.८१ टीएमसी पाणी संग्रह करण्याची क्षमता असलेल्या या आलमट्टी धरणात ९० टीएमसी पाणीसाठा करण्यात आले आहे.