राज्य

दोन वर्षानंतर भरणार्‍या आषाढी सोहळ्याची प्रशासकीय तयारी सुरू

पंढरपूर –  आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक पायी येत असतात. त्यांना पालखी माग व विसावा, मुक्काम तळांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन सलग दोन वर्षे आषाढी वार ही केवळ मोजक्या भाविकांच्या साक्षीने  प्रतीकात्मक साजरी झाली होती. यंदा मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्याने  लाखो वारकरी यात सहभागी होणार असल्याने प्रशासन आषाढी पालखी सोहळ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी तयारी करू लागला आहे. बैठका, पाहणी व नियोजन केले जात आहे. याच अंतर्गत पंढरपूरमध्ये यात्रेची पूर्व तयारी बैठक बैठक झाली.
आषाढी यात्रा पूर्व तयारीबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक अरुण पवार धनंजय जाधव, मिलिंद पाटील, उपकार्यकारी अभियंता डी.व्ही. मुखडे, भीमा कालवा मंडळाचे उपविभागीय अधिकारी  सुनील चौगुले, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार तसेच  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गुरव यांनी सांगितले , यंदाची आषाढी वारी 10 जुलै 2022 रोजी भरणार असून  या  यात्रेसाठी मानाच्या पालख्यासह इतर संस्थानच्या पालख्या  पंढरपुरात येतात. येणार्‍या भाविकांना पालखी मार्गाबरोबरच विसावा व मुक्काम तळांवर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी पालखी मार्ग वतळावरील काटेरी झुडपे काढावीत, ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील ती तत्काळ दूर करावीत. पालखी रथाच्या उंचीच्या प्रमाणात इलेक्ट्रिक तारा व इतर अडथळे येणार नाहीत यासाठी पाहणी करुन कार्यवाही करावी. पालखी मार्गावर व तळांवर पाण्याचे स्रोत निश्‍चित करावेत. पाण्याचे नमुने तपासणी करुन पाणी पिण्यास योग्य-अयोग्य याबाबतचे माहिती फलक लावावेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. त्याचबरोबर स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा, अखंडित वीज पुरवठा याबाबत दक्षता घ्यावी.
नगरपालिका, भीमा कालवा मंडळ, पोलीस प्रशासन यांनी  संयुक्तपणे चंद्रभागा नदीवरील घाटांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करुन  जाण्याचे व येणाचे मार्ग निश्‍चित करावेत, अशा सूचनाही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी केल्या.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close