Uncategorized

पंढरपुरात रविवारी पहिल्यांदाच भरतोय सॉफ्टवेअर क्षेत्रातील तरूणांचा मेळावा


पंढरपूर – पंढरपुरात कोरोना काळात अनेक माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आय.टी. क्षेत्रातील तरूण वर्क फ्रॉम होम (घरूनच) काम करत असून  त्यांचा मेळावा रविवार 8 मे रोजी भरविण्यात आला असून यातून पंढरपूरमध्ये  सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवा, रोजगार उपलब्ध करण्याची अणि पुढच्या वाटचालीची चर्चा होणार आहे.
आय.टी. क्षेत्रातील उद्योजक राज डुबल, गणेश अटकळ, शैलेश खरात यांनी या मेळाव्याचे या मेळाव्याचे आयोजन रविवार संध्याकाळी 5 वाजता कंडरेज रेसिडन्सी, इसबावी येथे केले असून या क्षेत्राशी निगडीत तरुणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


याबाबत माहिती देताना राज डुबल म्हणाले,  सॉफ्टवेअर क्षेत्रातील पंढरपूरकर  एकत्र येण्याची ही सुरुवात असू शकत.  तर एकत्र राहणे ही प्रगती आणि एकत्र काम करणे हे यश..या भावनेतून आम्ही काम करत आहोत. सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये काम करणार्‍या समविचारी तरूणांना एकत्र करणे आवश्यक असूलन यातून आयटी व्यावसायिकांचा समूह करण्याचा प्रयतन आहे. ज्यामुळे भविष्यात या क्षेत्राशी सकारात्मक गोष्टी घडतील व बर्‍याच संधी उपलब्ध होतील.
कोविड परिस्थितीमुळे बरेच जण घरून काम करण्यासाठी पंढरपूर किंवा जवळपासच्या भागात परत आलेले आहेत. पंढरपूरमधून आयटी क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला आम्ही आवाहन करतो की, आपण एकत्र आले येवून भविष्यात पंढरपुरातील आय.टी. क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देवू, असे डुबल म्हणाले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close