पंढरीत शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याला भरभरून प्रतिसाद
पंढरपूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा नेतृत्व अभिजीत पाटील स्नेह परिवार यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. नऊ मे पर्यंत जनतेसाठी या महानाट्याचे प्रयोग मोफत ठेवण्यात आले आहेत.
याचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी आमदार बबनराव शिंदे व आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुसर्या दिवशी या कार्यक्रमाला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार कैलास पाटील यांनी अभिजीत आबांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे की, सहकार क्षेत्रात यशस्वी ठरल्यावर देखील अभिजीत पाटील यांनी सांस्कृतिक वारसा जपला आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक अशिष मोदाणी, सी. पी. बागल, पोलीस निरीक्षक अरूण पवार, प्रशांत पाटील, राजेश नागदे, रोहीत बागल, किरणराज घाडगे, सुमनताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, पंढरपूरच्याच नव्हे तर सोलपूर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अभिजीत पाटील हे ज्या पद्धतीने चार साखर कारखाने यशस्वीरीत्या चालवत आहेत. त्याचप्रमाणे येथील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील भर घालण्याचे काम ते करत आहेत. पंढरपूर तालुक्यातील जवळपास 350 कलाकारांना अभिजीत पाटील यांच्यामुळ वाव मिळाला आहे.