राज्य

ना.नितीन गडकरींनी अवघ्या दोन आठवड्यात मंगळवेढ्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावला

पंढरपूर :मंगळवेढा – पंढरपूर राज्य महामार्गापासून मंगळवेढा सांगोला रस्त्यापर्यंत बाह्यवळण रस्ता भूसंपादन करून विकसित करण्यासंदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 25 जुलै रोजी भेट घेवून  मागणी केली होती. यास अवघ्या दोन आठवड्यात त्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

मंगळवेढा आणि पंढरपूर ही दोन्ही शहरे तीर्थक्षेत्रे असल्याने आषाढी व कार्तिकी एकादशी दरम्यान होणारी भाविकांची गर्दी, कर्नाटक राज्य, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूरहून होणारी अवजड वाहतूक आणि या अनावश्यक अवजड वाहतुकीमुळे मंगळवेढा शहरात होणारी वाहतूक कोंडी या सर्वांवरच कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे.

त्याचवेळी अपघातांचे प्रमाण देखील कमी होऊन या बाह्यवळण मार्गाच्या लगत असणाऱ्या गावांना व्यापार, औद्योगिक सुधारणा आणि दळणवळणाच्या सोयीसाठी उपयुक्त देखील ठरणार असल्याने आमदार आवताडे यांनी ही मागणी केली होती.

त्याचबरोबर सोलापूर – रत्नागिरी महामार्ग क्रमांक – 166 चे सर्वेक्षण करताना बोराळे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णतः बंद होणार असल्यामुळे या ठिकाणी बोगदा अथवा उड्डाण पूल करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली होती. आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा मालदांडी ज्वारी उत्पादनापैकी जवळपास 90 टक्के ज्वारीचे उत्पादन हे या भागात होत असल्यामुळे येथे अनेक शेतकऱ्यांची आणि नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी बोगदा अथवा उड्डाणपूलची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या व येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीची कदर करीत आ. समाधान आवताडे यांनी ही मागणी दिल्ली दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मांडली असता याची निकड लक्षात घेऊन गडकरी यांनी आ. आवताडे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बेगमपूर गावातील बंधाऱ्याऐवजी तामदर्डी गावात बंधारा बांधणे, माचणूर गावातील रहाटेवाडी- माचणूर छेदरस्त्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग करणे, बोराळे ॲप्रोच रस्त्याला भुयारी मार्ग तयार करणे अशा प्रकारच्या काही नवीन सुधारणाही या रस्त्याच्या बांधकामाकरिता काही ठिकाणी करण्याची विनंती आ. समाधान आवताडे यांनी ना.नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली होती.

बाह्यवळण रस्ता बांधण्यासाठी करावी लागणारी दुरूस्ती जमीन अधिग्रहण जागेच्या उपलब्धतेसह इतर बाबींबाबतचा व मंगळवेढा-बोराळे तसेच माचणूर रहाटेवाडी उड्डाणपूल बाबतचा अहवाल लवकरात लवकर नागपूर येथील गडकरी कार्यालयाकडे सुपूर्द करण्याचा आदेश नामदार नितीन गडकरी यांनी दिला आहे

त्यामुळे लवकरच या रस्त्यासंदर्भात पुढील कार्यवाहीला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आ. आवताडे यांनी यांनी सदर रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य दिशेने आवश्यक पाऊले उचल्याने व योग्य तो पाठपुरावा केल्याने ही मागणी मंजूर झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close