सामाजिक

कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच पंढरपूरसह पाच तालुक्यात निर्बंध, व्यापारी व नागरिकांनी सूचनेचे पालन करण्याचे आवाहन

 

 पंढरपूर दि. 11 :- सोलापूर  जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा पाच तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  निर्बंध  आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज केले.

सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे कोरोना निर्बंधाबाबत  तालुक्यातील पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर तसेच पदाधिकारी, व्यापारी, नागरिक आदी उपस्थित होते.

   राज्यात सोलापूर, नगर, बीड  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा  तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाच्या पहिल्या  व दुसऱ्या लाटेचा  परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला होता. संभाव्य येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.  प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये  तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून  फौजदारी  प्रक्रिया संहिता 73 चे कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्यात आले  असल्याचे  अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव  यांनी सांगितले.

 प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.जाधव यांनी सांगितले. 

 कोरोना संसर्गाच्या  पाहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत  जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी  प्रशासनास सहकार्य केले आहे. सध्या काही ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती रुग्ण संख्या तसेच  संभाव्य येणारी तीसरी लाट पाहता प्रशासनास प्रतिबंधात्मक  कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने ‍दिलेल्या सूचनाचे पालन करावे, अशा सूचना अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल  झेंडे यांनी दिल्या.

 यावेळी तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची तसेच रॅपिड अँटीजेन  तपासणी व लसीकरणाबाबत माहिती दिली.

पंढरपूर शहर व ग्रामीण भागाबाबत वेगळा निर्णय घ्यावा, वेळ वाढवावा तसेच कर माफ करावा आदी मागण्या यावेळी  व्यापाऱ्यांनी मांडल्या.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close