शिंदेची साखर कारखानदारीत दादागिरी , सर्वाधिक गाळप व उतारा
पंढरपूर – यंदाच्या 2023-24 च्या गळीत हंगामात राज्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने आपला दबदबा कायम ठेवला असून दोन्ही युनिटसह शिंदे यांच्या जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी 19 डिसेंबरपर्यंत जवळपास साडेतेरा लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. शिंदे कारखाना युनिट क्रमांक दोन करकंब साखर उताऱ्यात प्रथम आहे.
आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह त्यांच्याशी निगडीत पाच कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली आहे. शिंदे कारखाना युनिट क्रमांक एक मध्ये 49 दिवसात 6 लाख 26 हजार 816 मे. टन तर युनिट दोन करकंब येथे 2 लाख 08 हजार 533 टन असा एकूण 8 लाख 35 हजार 349 मे. टन उसाचे गाळप झाले आहे. युनिट एकचा सरासरी साखर उतारा 10.76 तर युनिट दोनचा 11.03 टक्के आहे. युनिट दोन हे जिल्ह्यात साखर उताऱ्यात क्रमांक एक वर आहे.
शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटमध्ये मिळून 3 कोटी 25 लाख 47 हजार युनिट वीज निर्मिती सहवीज प्रकल्पातून झाली आहे. यात युनिट एक मध्ये 2 कोटी 49 लाख 10 हजार युनिट तर दोन मध्ये 76 लाख 37 हजार युनिटचा समावेश आहे.
शिंदे यांच्याशी निगडीत अन्य कारखान्यांमधील गाळप बबनराव शिंदे कारखाना केवड येथे 46 दिवसात 2 लाख 54हजार 550 टन, कमलाभवानी कारखाना करमाळा 96 हजार 900 टन तर विठ्ठल शुगर म्हैसगाव येथे 1 लाख 43 हजार 992 टन उसाचे गाळप झाले आहे.
दरम्यान पुणे व परिसरातील मोठ्या कारखान्यांमधील गाळप पुढील प्रमाणे – बारामती ॲग्रो बारामती 46 दिवसात 7 लाख 8 हजार 60 टन, सोमेश्वर सहकारी 4 लाख 27 हजार 99, माळेगाव कारखाना 4 लाख , अंबालिका कर्जत 4 लाख 74 हजार , जवाहर कोल्हापूर 3 लाख 5 हजार , छत्रपती सहकारी भवानीनगर 1 लाख 88 हजार तर राजाराम सहकारी युनिट एक 2 लाख 68 हजार 450 मे. टन.