प्रशांत परिचारक यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान
पंढरपूर – श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांना साखर उद्योगामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार रविवारी पुणे येथे राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री जयंत पाटील , साखर आयुक्त शेखर गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष एस.एस.गंगवती, एस. एस. भड, कारखान्याचे संचालक उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया ही संस्था देशपातळीवर साखर उद्योगामध्ये काम करीत असून प्रत्येक वर्षी या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मान करीत असते. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सन २०२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज केले असून साखर उतार्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच ऊस गाळप व साखर उत्पादनामध्ये ही कारखान्याने यावर्षी उच्चांक निर्माण केले आहेत. कारखान्याने उभारलेला सहवीज निर्मिती , आसवनी प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, ऑक्सिजन प्लॉन्ट, बायो ङ्गर्टिलायझर लॅब, माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा या व्यवस्थित चालवून त्यामधूनही उच्चांकी उत्पादन घेतले आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी कारखान्याच्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारखान्याची घौडदौड सुरु असून ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेवून त्यांचे हित जोपासले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, दिनकराव मोरे, वसंतराव देशमुख, हरीश गायकवाड, रोहन परीचारक, उमेश विरधे उपस्थित होते.