विशेष

विठ्ठल रुक्मिणी चरणी अठरा लाखाचे दागिने


पंढरपूर –  बाई लिंबा वाघे (रा.बेंबळी जिल्हा धाराशिव) या महिला भाविकाने श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या चरणी अठरा लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने  अर्पण केले आहेत.
 श्री विठ्ठलास 255 ग्रॅम वजनाचा सोन्याचा करदोडा व श्री रूक्मिणी मातेस 19 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र मंगळवारी रूक्मिणी पांडुरंग चरणी वाघे यांनी अर्पण केले  असून याची अंदाजित रक्कम  17 लाख 99 हजार 399 रूपये इतकी आहे. देणगीदार यांचा सत्कार आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांचे हस्ते साडी, उपरणे तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी मंदिरे समितीचे सराफ व कर्मचारी उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close