राज्य

कारखान्यांच्या निवडणुकीमुळे मंगळवेढा- पंढरपूर व मोहोळमध्ये विस्कटलेली पक्षाअंतर्गत मोळी फडणवीस बांधणार !


देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौर्‍यावर येत असून ते एकादशी दिवशी शुक्रवारी दुपारी बारा वाजता मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगर्स चा गळीत हंगाम शुभारंभ करणार आहेत.  यावेळी ते उसाची मोळी पूजन करतील व कारखाना साखर उत्पादन सुरू करेल. याच वेळी फडणवीस यांना नेत्यांची विस्कटलेली मोळी एकत्र करावी लागणार आहे व यासाठी ते साखर पेरणी करतील अशी चर्चा आहे. 

स्वेरी राज्यातील सर्वाधिक यशस्वी अभियांत्रिकी महाविद्यालय का आहे…पाहा


पंढरपूर – उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यातील सर्वात ताकदवान नेते देवेंद्र  फडणवीस हे उद्या बुधवारी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी येणारे फडणवीस मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या साखर कारखान्यात मोळी पूजन ही करणार आहेत. दरम्यान या भागात साखर कारखान्यांच्या निवडणुकीमुळे पक्षाअंतगर्र्त नेत्यांची मोळी विस्कटली असून ती बांधण्याचे काम ते करतील ,अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
दामाजी व भीमा कारखान्याच्या निवडणुकीमुळे माजी आमदार प्रशांत परिचारक व भाजपाचे आमदार समाधान आवताडे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. आवताडे यांना दामाजी कारखान्यात परिचारक समर्थकांनी पराभूत केल्याने सहाजिकच नाराजीचा सूर आहे. यात भाजपाचेही पदाधिकारी आवताडे यांच्या विरोधात गेले होते. यानंतर आवताडे व परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युध्द बरेच दिवस सोशल मीडियावर गाजत होते. यानंतर आता मोहोळच्या टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असून यात परिचारक यांनी अद्याप जाहीर सहभाग नोंदविला नसला तरी त्यांचे समर्थक तयारीने उतरले असल्याने दामजीप्रमाणेच पडद्यामागून खेळ्यांना ऊत येण्याची शक्यता आहे. महाडिक हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे आता ते प्रशांत परिचारक यांना पंढरपूर दौर्‍यात काय कानपिचक्या देणार हे लवकरच लक्षात येईल.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष नसतात मात्र या कारखान्यांवर राजकारण अवलंबून असते. यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतात. पक्षाच्या विद्यमान खासदार व आमदारांविरोधात माजी आमदार अशी प्रतिमा येथे तयार झाली आहे. परिचारक यांचे कारखाने चांगले चालत असल्याने सहाजिकच त्यांच्या प्रती येथे आदराची भावना आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close