उजनी वर 12 मे पासून 89 मि.मी. पावसाची नोंद , धरण अर्धा टक्का वधारले

पंढरपूर– यंदा ऐन उन्हाळ्यात उजनी जलाशयावर पर्जनराजाने मे महिन्यात दमदार हजेरी लावली असून 12 ते 21 मे दरम्यान 89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान धरण वधारण्यास सुरुवात झाली असून अर्धा टक्का पाणी जलाशयात वाढले आहे.
यंदा राज्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस कोसळत असून उजनी परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. 22 मे रोजी सकाळी सकाळपर्यंत उजनी जलाशयावर एका दिवसात 45 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होती. 12 मे पासून उजनी परिसरात पाऊस कोसळत आहे. 12 मे ला एक मि.मी. पावसाची नोंद होती. तर 14 रोजी 28 मिलिमीटर, वीस रोजी चार 21 ला 11 तर 22 मे रोजी 45 मि.मी. पाऊस पडला आहे. 2024 च्या पावसाळ्यापासून 22 मे 2025 पर्यंत उजनी धरणावर एकूण 673 मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या या मान्सूनपूर्व पावसामुळे उजनी आशियातील पाणी पातळी काहीशी वाढली असून 21 मे रोजी धरण वजा 22.96% अशा स्थितीत होते. ते 22 रोजी वजा 22.31% अशा स्थितीत पोहोचले आहे. सुमारे अर्धा टक्का पाणी जलाशयात वाढले आहे. दौंड जवळून थोड्या फार प्रमाणात विसर्ग जलाशयात मिसळत होता. हा अवकाळी पाऊस असल्यामुळे येणारी आवकही लगेच मंदावणार आहे. उजनीसह पर्जन्य क्षेत्रातही चांगला पाऊस गेल्या काही दिवसात पडला आहे याचा फायदा उजनीला होताना दिसत आहे.
भीमा व निरा खोऱ्यात अनेक धरणांवर या अवकाळी
पावसाची नोंद आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदान असणाऱ्या उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 51.51 टीएमसी इतका असून मृतसाठ्यातील 11.95 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे सध्या धरणातून मुख्य कालव्यात बाराशे क्युसेक व भीमा सीना जोडकाव्यात 180 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
