विशेष

उजनीत 30 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याची वरदानी असणाऱ्या उजनी धरणामध्ये 31 मार्च 2023 रोजी 30.86% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
2022 च्या पावसाळा हंगामामध्ये उजनी प्रकल्प क्षमतेने म्हणजे 111 टक्के भरला होता. याचबरोबर मागील वर्षी पावसाळा हंगामहि लांबला होता यामुळे जानेवारी 2023 पर्यंत सिंचनासाठी पाण्याची मागणी नव्हती. यानंतर रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सतत पाणी सोडले गेले आहे यामुळे उजनी धरण मार्च महिना संपताना 30.86% उपयुक्त पाणी पातळीत आहे. अद्यापही उजनी धरणातून सर्वच योजनांकरता पाणी सोडले जात आहे सध्या भीमा नदीत चार हजार क्युसेक ने पाणी सोडले जात आहे. यासह मुख्य कालव्यात तीन हजार सीना भीमा जोडकालव्यात 880 दहिगाव योजनेत 100 तर सीना माढा योजनेसाठी 333 क्युसेक ने पाणी सोडले जात आहे.
उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 80.19 टीएमसी इतका आहे तर उपयुक्त पाणी 16.53 टीएमसी इतके शिल्लक आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मागील 24 तासात 5.95 मिलिमीटर म्हणजेच 1. 14 दशलक्ष घनमीटर इतके बाष्पीभवन नोंदले गेले आहे. सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत जपून वापरावा लागणार आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close