यंदा मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा , पाहा किती ?
पंढरपूर- राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार हे निश्चित आहे. सध्या राज्यातील सर्व लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांचा विचार केला तर गतवर्षीच्या तुलनेत 21 टक्के कमी पाणी शिल्लक आहे. सर्वात नीचांकी जलसाठा हा मराठवाड्यात 37 टक्के इतका आहे.
सध्या हिवाळा हंगाम सुरू असून राज्यातील धरणांमधील पाणी साठा हळूहळू कमी होवू लागला आहे. मराठवाड्यातील पाणीस्थिती ही चिंताजनक आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त म्हणजे 44 धरणं असून यात आजच्या तारखेला सरासरी 43 टक्क पाणी शिल्लक राहिले आहे. तर लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पात मिळून 37.09 टक्के जलसाठा आहे.
पुणे विभागात 71.39 टक्के पाणी 35 धरणांमध्ये शिल्लक आहे. तर सर्व प्रकल्पांचा विचार करता 68 टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागातील लहान. मध्यम व मोठ्या धरणांमध्ये 70.40 , अमरावती 74.93 , नागपूर 58.57 तर कोकण विभागात 80.56 टक्के पाणी शिल्लक आहे.