राज्य

कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन

पंढरपूर – कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्यावतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सात दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.

पांडुरंग परिवाराच्यावतीने 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कार्य काळामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक स्मृती सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. याबाबत माजी आमदार प्रशांतराव परिचारक, उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रणव परिचारक आणि पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार स्वर्गीय सुधाकर पंतांचा वसा आणि वारसा सेवेच्या रूपाने सुरू ठेवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने चंद्रभागा नदी स्वच्छता अभियान, विविध वृद्धाश्रम ,बालकाश्रम, कुष्ठरोग वसाहत ,अंधशाळा, विविध शाळांमध्ये सकस भोजन व शैक्षणिक साहित्याचे वाटप , रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दिव्यांग नागरिकांसाठी , महिलांसाठी हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दंतरोग तपासणी शिबिर ,महिला बचत गटांना अर्थसहाय्य करणारे कर्जवाटप सोहळा असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याशिवाय भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन देखील होणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील गणेश रुग्णसेवा मित्र मंडळाच्या वतीने कायमस्वरूपी कर्मयोगी दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र उभा करण्यात येत आहे. हे सर्व कार्यक्रम 25 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय काही विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील पांडुरंग परिवाराच्या वतीने होत आहे.

सेवा सप्ताह मधील विविध कार्यक्रमाचे आयोजन हे पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक, पांडुरंग परिवारातील पदाधिकारी पांडुरंग परिवारातील युवा नेते मित्रमंडळी, आणि कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदिनी पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने वाखरी येथील नियोजित कर्मयोगी सुधाकरपंतांच्या स्मारकाच्या ठिकाणी कीर्तन व पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याने केले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास पंढरपूर शहरातील नागरिकांनी पांडुरंग परिवारातील सदस्य हितचिंतक ,मित्र ,आप्तेष्ट यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांच्या विचारांचा वारसा सेवारुपी आत्मसात करावा, असे आवाहन या निमित्ताने आमदार प्रशांतराव परिचारक, व उमेशराव परिचारक यांच्यावतीने युवा नेते प्रणव परिचारक यांनी केले आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close