विशेष

स्वेरी फार्मसीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीत निवड

पंढरपूर- ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल २३ विद्यार्थ्यांची ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या आणि मुख्य शाखा अहमदाबाद (गुजरात) येथे असलेल्या ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील सागर भाऊसाहेब बेलदार, प्रमोद बाबू बिराजदार, प्रशांत शिवाजी दुधभाते, गंगासागर अशोक गोरंटी, केदारनाथ हनुमंत काकडे, ओंकार ज्ञानदेव काकडे, सुरज रामकृष्ण काळे, नागेश नवनाथ खाडे, संकेत बाळासाहेब खंदारे, अजित दाजी खिलारे, अभिषेक रावसाहेब मगर, परवेज प्यारेलाल मुजावर, प्रज्वल अण्णा नागणे, विश्वजीत राजकुमार पाटील, ऋत्विक शिवाजी पिंगळे, सिद्धेश्वर विठ्ठल रोंगे, सिद्धेश्वर सुनील साखरे, प्रभू हनुमंत साठे, रोहन रामचंद्र सुतार, साजिद इस्माईल तांबोळी, राहुल पोपट वाकडे, अंकित नितीन मर्दा व तेजस राजेश पाटील असे मिळून एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड केली. बी.फार्मसीची स्थापना २००६ साली झाली असून तेंव्हापासून प्रत्येक वर्षीचा वार्षिक परीक्षेचा निकाल आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये तज्ञ प्राध्यापकांकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, यांचा समावेश आहे. यासाठी जी.टी. टी. या संस्थेचे सहकार्य लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, फार्मसीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close