विशेष

सहकार शिरोमणीचा 2300 ₹ प्रति टन ऊसदर जाहीर, शुक्रवारपासून बिले खात्यावर जमा होणार


पंढरपूर – गळीत हंगाम 2021-22 मध्ये भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळाने एकूण प्र.मेट्रिक टन रु.2300/- दर जाहीर केला आहे. यापैकी पहिला हप्ता रु.2000/- प्रमाणे पहिल्या पंधरवड्यात देण्यात येणार असून,उर्वरित बिलाची रक्कम दोन टप्प्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

प्रचलित ऊस वाहतूक दरामध्ये 13 टक्के दरवाढ करून पंधरवडा वाईज बिले अदा करण्यात येतील.

सन 2020-21 मध्ये ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. त्यांची एफ आर पी प्रमाणे ऊस बिले शुक्रवारपासून संबंधितांचे बँक खात्यावर गटवार जमा करण्यात येणार आहेत.

सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व वाहतूकदार यांनी याची नोंद घेऊन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2021-22 करिता जास्तीत जास्त ऊस गळीतास देवून सहकार्य करावे ,असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close