विशेष

उद्यापासून पंढरपूरसह पाच तालुक्यात दहा दिवस कडक निर्बंध , सोलापूरमधील बैठकीत प्रशासनाची स्पष्टोक्ती

सर्व बातम्यांचे अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏻 https://chat.whatsapp.com/FtO0UDHUxzmLWnQPmMEQAX

पंढरपूर –  कोरोनाची वाढती संख्या पाहता पंढरपूरसह पाच तालुक्यात जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध उद्या शुक्रवार 13 ऑगस्ट पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यास पंढरपूरसह इतरत्र व्यापारी महासंघाने विरोध केला होता. याबाबत पंढरपूरचे विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हाधिकारी यांची बैठक सोलापूरला संपन्न झाली व यात दहा दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येतील असे सांगण्यात आले. याबाबतचे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
आजच्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीवकुमार जाधव, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अधिकारी तसेच पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर , मनसे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे, सचिन पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. संचारबंदीला विरोध करण्यासाठी गेले तीन दिवस पंढरीत आंदोलन होत होती. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा संसर्ग पाच तालुक्यात कसा वाढला आहे याची माहिती दिली व दहा दिवस कडक निर्बंध लागू करत असल्याचे स्पष्ट केले.
ही संचारबंदी पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यात असणार आहे.  

Header

Related Articles

Back to top button
Close
Close