यंदाच्या कार्तिकीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न दीड कोटी रुपयांनी वाढले
पंढरपूर – कार्तिकी यात्रा 2023 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला गतवर्षीच्या तुलनेत एक कोटी 56 लाख 48 हजार 526 रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे ही यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर यादरम्यान पार पडली.
कार्तिकी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमातून चार कोटी 77 लाख 8 हजार 268 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या पायावर भाविकांनी चाळीस लाख पंधरा हजार 667 रुपये अर्पण केले आहेत. तर देणगी स्वरूपात एक कोटी तीस लाख ५४८६ रुपये मिळाले आहेत. लाडू प्रसादातून 62 लाख 49 हजार , भक्तनिवास 66 लाख 62 हजार 377 रुपये, सोने चांदी भेटवस्तू आठ लाख 36 हजार 254 रुपये, परिवार देवता व हुंडी पेटीतील उत्पन्न एक कोटी 57 लाख 21 हजार 527 रुपये, मोबाईल लॉकर इतर जमेमधून दहा लाख 94 हजार 807 रुपये उत्पन्न मिळाले आहे.
यंदा सुमारे तीन लाख 40 हजार 478 भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन घेतले तर मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या पाच लाख 71 हजार 220 एवढी होती ,अशी माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.