विशेष

उजनी जलाशयात तब्बल २८ वर्षांनी १ कोटी मत्स्यबीज सोडली जातायेत

वालचंदनगर- उजनीतील माशांच्या चवीची सर्व महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे येथे विविध प्रजातींच्या माशांचे संगोपन होणे गरजेचे आहे,हे पाहता शासनाच्यावतीने दरवर्षी उजनी जलाशयात एक कोटी मत्स्यबीज सोडणार येणार असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
तब्बल २८ वर्षाच्या कालावधीनंतर उजनी जलाशयात शासनाच्यावतीने एक कोटी बोटुकली( मत्स्यबीज) सोडण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. कुंभारगाव(ता. इंदापूर) येथील जलाशयात पाच लाख मत्स्यबीज भरणे यांच्या हस्ते सोडण्यात आले. उर्वरित मत्स्यबीज टप्प्या टप्प्याने सोडण्यात आहे.
यावेळी मत्स्य विभागाचे सहआयुक्त(भुजल) रवींद्र वायडा, प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे,उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, तहसीलदार श्रीकांत पाटील, किरण वाघमारे,भीमाशंकर पाटील,प्रताप पाटील,सरपंच उज्वला परदेशी, सचिन बोगावत,ॲड.पांडुरंग जगताप,शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, विजय नगरे,सीताराम नगरे,चंद्रकांत भोई यांनी मनोगत व्यक्त केली.उज्वला परदेशी यांनी मच्छिमारांच्या विविध समस्या मांडल्या.
भरणे पुढे म्हणाले की,२८ वर्षानंतर धरणात मत्स्यबीज सोडत असून आत्ता यापुढील काळात आपण दरवर्षी डीपीसीच्या माध्यमातून(जिल्हा नियोजन समिती) उजनी जलशयात सोडण्यात येणार आहे. तसेच सोलापूर व नगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाकडूनही मत्स्यबीज सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लहान मासे पकडणाऱ्यांवरतीदेखील कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
सध्या हे मत्स्यबीज पाण्यात सोडल्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही भोई व मच्छिमार बांधवांची राहणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आपलीही जबाबदारी आहे.त्यामुळे लहान जाळ्याच्या सहाय्याने होणारी बेकायदेशीर मासेमारी व शासनाने बंदी घातलेला मांगूर माश्यांवर पालनावर कडक कारवाई होणार आहे.अन्यथा मत्स्यबीज सोडून उपयोग होणार नसल्याचे ते म्हणाले.मासे मोठे झाल्यावर पकडण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मत्स्यबीज आणण्यासाठी प्रशांत हिरे, नंदकुमार नगरे,किरण गिते यांनी परिश्रम घेतले.

..आणि कारवाईची धावपळ…
अवैध मासेमारी करणाऱ्यांवर अवैध वाळू धोरणांप्रमाणेच कारवाई करण्याच्या सूचना आमदार भरणे यांनी अधिकाऱ्यांसमक्ष दिल्या होत्या. त्यातच मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम चालू असताना नागरिकांनी समोरच्या किनाऱ्यावर लहान मासे मारणाऱ्यांची टोळी आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. लागलीच भरणे यांनी अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या आणि क्षणात धावपळ उडाली.बोटीतून अधिकारी कारवाईला गेले मात्र टोळी पळ काढण्यात यशस्वी झाले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close