विशेष

मोहोळ – आळंदी पालखी मार्गावरील दिवे घाट होणार चौपदरी, 792 कोटी रूपयांची तरतूद


पंढरपूर – महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 965 या मोहोळ-आळंदी पालखी महामार्गावरील दिवे घाट ते हडपसर (पॅकेज-6) या 13.25 किलोमीटर लांबीच्या विद्यमान 2-लेन स्ट्रेचच्या चौपदरीकरणाला 792 कोटी 39 लाख रुपयांच्या निधीसह स्वीकृती देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
सदर रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे हडपसर व दिवे घाटातील रहदारीची समस्या कमी होईल. तसेच आषाढी वारीदरम्यान या मार्गावरून मार्गक्रमण करत असलेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीतील जवळपास 10 लाखांहून अधिक वारकर्‍यांची सोय होणार आहे. चौपदरीकरणामुळे प्रवाशांची वाहतूक सुलभ होण्यासाठी याची मदत होईल, असे गडकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
आळंदी व देहू ते पंढरपूर अशा दोन्ही पालखी मार्गांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. आळंदी ते पंढरपूर हा पालखी मार्ग मोहोळपर्यंत नेण्यात आला आहे. मोहोळ ते पंढरपूर या चाळीस किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. तर पंढरपूर ते पुणे रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. पंढरपूर ते नातेपुते हे सोलापूर जिल्ह्यातील काम लवकरच पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. हा पालखी मार्ग सासवडच्या पुढे असणार्‍या दिवे घाटातून जात असून तो रस्ता लहान आहे. यास आता केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून घाटात चौपदरी रस्ता असणार आहे. यामुळे आषाढी काळात पायी चालत येणार्‍या वारकर्‍यांची सोय तर होणारच आहे. याचबरोबर अन्यवेळी सुलभ व जलद वाहतूक यामुळे शक्य होणार आहे. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close