विशेष

प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय समितीची स्थापना, अध्यक्षपदी आदित्य फत्तेपुरकर यांची नियुक्ती

पंढरपूर :- राज्य शासनाने पंढरपूरचा विकास करण्यासाठी नवीन विकास आराखडा तयार केला असून मंदिर परिसरात कॉरिडॉर करून
भाविकांना सुखसुविधा देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या प्रस्तावित कॉरिडॉरला पंढरपूरकरांनी विरोध केला आहे. यासाठी सर्व पक्ष व संघटनांची पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांची तर सचिव पदी हिंदू महासभेचे अभयसिंह इचगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

शहर – तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे प्रमुख पदाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.
१९६२ पासून तीन वेळा पंढरपूरचे रस्ता रुंदरीकरण तसेच इतर प्रकारे विकास करण्यात आला. यामध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांना अद्याप राहती जागा देखील मिळाली नाही. 1985 च्या विस्थापितांचे पुनर्वसन झालेले नसतानाच राज्य शासनाने नव्या कॉरिडॉरचा घाट घातलाय. या कॉरिडॉरमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर छोटे मोठे व्यावसायिक देखील रस्त्यावर येणार आहेत. पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीच्या वतीने विविध मार्गांनी या कॉरिडोरला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ भालके, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, काशिनाथ थिटे असणार आहेत.
तर सदस्यांमध्ये श्रीकांत शिंदे, अरुण भाऊ कोळी, विक्रम शिरसट, राजू उराडे, गणेश अंकुशराव, विवेक बेणारे, सौरभ थिटे गणेश पिंपळनेरकर, साईनाथ बडवे, अर्जुन चव्हाण, संतोष कवडे, किरण घाडगे, संजय दशरथ घोडके, रवी मुळे विनोद लटके, अॅड.अशितोष बडवे. राजेश भादुले, कीर्तीपाल सर्वगोड,सुधीर भोसले सुमित शिंदे, चैतन्य महाराज देहूकर, वैभव बडवे, वैभव जोशी, श्रीनिवास उपळकर, मोहम्मद उस्ताद,शिवाजी मस्के, वेंकटेश कुलकर्णी, अमृत ताठे देशमुख अशी तगडी मंडळी असणार आहेत. तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार राजाभाऊ शहापूरकर, पत्रकार अभिराज उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close