कोरोना रूग्णसंख्येत शुक्रवारी पंढरपूर तालुका जिल्हा ग्रामीणमध्ये अव्वल, 104 जणांची नव्याने नोंद
पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 376 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील 104 जणांची नोंद आहे. यामुळे या तालुक्यातील एकूण कोेरोना रूग्णांचा आकडा हा 27 हजार पार गेला आहे. पंढरपूर तालुक्यात 1 जणाच्या मृत्यूची ही आज नोंद आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 27 हजार 1 आढळून आले असून यापैकी 520 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 हजा 976 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 505 जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारच्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 13 तर ग्रामीण भागात 91 नव्या रूग्णांची नोंद आहे. आजवर शहरात 8 हजार 483 तर ग्रामीण भागात 18 हजार 518 रूग्णांची नोंद आहे. शहरातील 184 जणांनी तर ग्रामीणमधील 336 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या शहरातील 73 तर ग्रामीणमधील 432 जणांवर उपचार सुरू आहेत.