राज्य
पंढरपूर तालुक्यात पावसाचा जोर, कासेगाव भागात सर्वाधिक नोंद
पंढरपूर – परतीचा मान्सून राज्यात चांगलाच बरसत असून पंढरपूर तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच जोरदार पाऊस पुन्हा बरसत आहे. मंगळवार रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत सरासरी २५ मि्. मी. पावसाची नोंद होती. सर्वाधिक पाऊस कासेगाव मंडलात ४५ मि. हि. नोंदला गेला.
पंढरपुर तालुका आज
दि. 12/10/2022 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब- 13 मिमी
पट कुरोली 43 मिमी
भंडीशेगाव 29 मिमी
भाळवणी- 33 मिमी
कासेगाव – 45 मिमी
पंढरपूर- 35 मिमी
तुंगत- 00 मिमी
चळे- 19 मिमी
पुळुज 11 मिमी