पंढरपूर – मागील सतरा वर्षात आमदार बबनराव शिंदे यांनी माढ्यात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी शिबिर भरवून आजअखेर 22 हजार नेत्ररूग्णांची तपासणी करून 12 हजार नेत्र रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिली आहे. यंदाही विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ,निमगांव (टे) व माढेश्वरी अर्बनबँक यांच्या सहयोगातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 8 ते 12 फेब्रुवारी,2023 या कालावधीमध्ये सन्मती नर्सिंग होम,माढा येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये जागतिक किर्तीचे नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारेख, सर जे.जे. रूग्णालय,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली माढा येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशाला,माढा येथे नेत्ररूग्णांची तपासणी होणार आहे. त्यानंतर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 12 रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची तपासणी व कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या शिबिराचे नियोजनासाठी माढेश्वरी बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, शासकीय आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मंगळवार 17 जानेवारी रोजी संपन्न होणार असून बैठकीमध्ये शिबिराचे कामकाजाचे रूपरेषा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
Back to top button