विशेष

अनेक वर्षांनी सांगोला कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित झाला, शेतकर्‍यांच्या उसाची सोय  


पंढरपूर-  सांगोला सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांच्या धाराशिव कारखान्याने चालविण्यास घेतला असून  येथे सन 2021-22 च्या  गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माउली महाराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास दहा ते बारा वर्षे बंद असणारा हा कारखाना यंदा सुरू होत असल्याने सांगोला व पंढरपूरच्या उसाची सोय होणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते सागर पाटील उपस्थित होते.  यावेळी ह.भ.प.माउली महाराज यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी होमहवन पूजा पळशी गावचे प्रगतशील बागायतदार हणमंत पाटील व रतनताई पाटील तसेच पांढरेवाडी गावचे सचिन घाटे व  उर्मिलाताई घाटे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.
साळुंखे-पाटील म्हणाले , तीन साखर कारखाने चालविण्याचा दांडगा अनुभव अभिजित पाटील यांच्याकडे असल्याने कारखान्याची कामे लवकर पूर्ण केली आहेत. कारखानदारीतील डॉक्टर म्हणून त्याच्याकडे बघितला तर वावगं ठरणार नाही. या भागातील शेतकर्‍यांना, कामगारांना न्याय देण्याचं मोठे काम त्यांनी केले आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगोला,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपास आणू अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी दिली. याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजित भोसले, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे यांच्यासह सांगोल्याचे चेअरमन विश्‍वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव उपस्थित होते.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close