राज्य

खासगी साखर कारखानदारीत आवताडे शुगरकडून उसाला जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर

पंढरपूर – सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व पहिलाच गळीत हंगाम घेत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या अवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने २३५० रु प्रतिटन ऊसबिलाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून खासगी कारखानदारीत जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचा विक्रम केला आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वी फॅबटेक शुगरचे आवताडे शुगरमध्ये रूपांतर झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीनिशी यंत्रणा लावत कामगार भरती करून दोन महिन्यात साखर कारखाना सुरू करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चार नोव्हेंबर रोजी मोळीपूजन केले. त्यानंतर 24 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत कारखाना व्यवस्थित सुरू केला असून शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा दर हा कारखाना देईल असा दिलेला शब्द पाळत सर्व जातीच्या उसाला समान 2350 रुपयाची पहिली उचल जाहीर केली असून सोमवारपासून शेतकऱ्यांना बँकेतून पैसे मिळणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली.

यावेळी आवताडे म्हणाले कि , आवताडे शुगर सर्वाधिक दर देणार असा विश्वास आमच्या परस्पर शेतकऱ्यांना सुद्धा होता आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभारला असून आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, वाहन मालक, वाहन चालक, कारखान्याचे शेतकी अधिकारी ऊसतोड कामगार झटत असून या सर्वांचे मोलाचे योगदान असून उसाची रिकव्हरी अजून चांगली वाढली तर अजून चांगला दर देण्यात येईल, असे यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी बोलून दाखविले.

आम्ही समाधानी
आवताडे शुगर ने उसाच्या जातीत एकदुसरेपणा न करता सर्व जातीला एकसमान दर दिल्याने आम्ही या दरावर समाधानी आहे. – अनिल बिराजदार अध्यक्ष स्वा.शेतकरी संघटना

आवताडे शुगर ने बिनचूक वजन ठेवले असून बंद पडलेला कारखाना घेऊन सुरू करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोळीपूजनाला आणून त्यांच्या साक्षीने हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे सिद्ध करेन असा शब्द दिला होता ती शब्द त्यांनी पाळत सर्वाधिक दर दिला आहे . – बापुराया चौगुले सावकार, शेतकरी


या शाखेतून मिळणार शेतकऱ्यांना बिल

बबनराव आवताडे पतसंस्था
शाखा मंगळवेढा –
मंगळवेढा, कचरेवाडी, घरनिकी, धर्मगाव, खडकी, मल्लेवाडी, घाटोळे वस्ती, खोमनाळ, चिक्कलगी, शिरनांदगी

शाखा मरवडे – मरवडे, येड्राव, निंबोणी, हुलजंती, माळेवाडी, तळसंगी, भाळवणी (मंगळवेढा), डोणज, नंदुर, बनतांडा (बालाजीनगर), कात्राळ,कर्जाळ,कागष्ट.

शाखा माचनूर- माचनूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, अर्धनारी, सोहाळे, कोथाळे, इचगाव, येणकी, मिरी, अरबळी, वटवटे, वडदेगाव, नळी, आंबेचिंचोली.

राजमाता अर्बन बँक –
शाखा मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ढवळस, गुंजेगाव (मं.), महमदाबाद (शे), लक्ष्मी दहिवडी, मुढवी.

यशोदा महिला पतसंस्था मंगळवेढा-
अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, शरदनगर (ढेकळेवाडी), नंदेश्वर, मारापुर.

जनकल्याण मल्टीस्टेट पंढरपूर- तावशी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, रांझणी, भोसे (क), तारापूर.

शाखा बेगमपूर –
बेगमपूर, पुळुज, पुळुजवाडी, औंढी, पाटकुल, टाकळी सिकंदर.

शाखा भंडारकवठे –
भंडारकवठे, तेलगाव, कुसुर, निंंबर्गी.

शाखा धुळखेड –
धुळखेड, तद्देवाडी, हवीनाळ, गुंदवान, चणेगाव, टाकळी उमराणी, शिरगुर, शिरनाळ.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close