तंत्रज्ञान

स्वेरीचा राज्यात डंका, विप्रो कंपनीत 108 विद्यार्थ्यांची निवड. कोरोनाकाळात ही 600 जणांना दिली होती नोकरी

पंढरपूर – राज्याच्या  शिक्षणक्षेत्रात डॉ.बी.पी.रोंगे सरांनी स्वेरी कॉलेजच्या माध्यमातून पंढरपूर पॅटर्न प्रसिध्द केला आहे. याच माध्यमातून कोरोनाच्या प्रतिकूल काळाही  श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील सहाशे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली होती. तर आता 2022 मध्ये शेकडो विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये निवडले जात आहेत. ‘विप्रो’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत  एकाचवेळी तब्बल 108 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.
1998 साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे अ‍ॅप्टीट्यूड, कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्ह्यू यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्‍या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते.

विप्रोमध्ये गणेश बाळासाहेब बागल, मनोज ज्ञानेश्‍वर भूमकर, शिवानी राजकुमार घायतिडक, स्नेहल शिवाजी बोराडे, अभय प्रताप देशमुख, अभिजित अजय कारंडे, अभिषेक महेश आराध्ये, ऐश्‍वर्या दत्तात्रय तोडकरी, अक्षदा मिलिंद देशपांडे, अनिशा शांतीनाथ सावंत, अश्रुभा लहू भोरे, आशुतोष अतुल डोळे, चैतन्य वैभव भोसले, चंद्रोदय विठ्ठल कलशेट्टी, चेतन रमेश क्षीरसागर, दीक्षा दिगंबर लाळे, दीप्ती बंकट पाटील, फिझा सैफन शेख, गौरव राजेंद्र वाघमारे, गौरी प्रमोद कुलकर्णी, गायत्री विनायक दीक्षित, गीतेश्‍वरी अनिल शिंदे, ऋषिकेश संतोष साठे, कोमल सुधीर कडलासकर, कोयल विजय सावंत, मधुरा मिलिंद बडवे, मुकुंद सुभाष खपाले, प्राजक्ता रामचंद्र पलसे, पूजा आबासाहेब काटे, प्रणाली केशव खोटे, प्रणेश प्रकाश सुतार, प्रसाद रामचंद्र भोसले, प्रशांत जगन्नाथ जलगीरे, प्रतीक राजेंद्र यादव, प्रतीक सुभाष देशपांडे, प्रीती ज्ञानेश्‍वर चव्हाण, प्रियांका मारुती माने, रसिका अखिलेश वेळापूरे, रोहित किरण भोसले,  साक्षी मनोज कोतलवार, सानिका रमेश व्यवहारे, शिवानी राजेश आवताडे, श्रुती बापूसाहेब बिले, श्रुती श्रीनिवास बडवे, स्नेहा चिंतामणी लोहकरे, वैष्णवी ज्ञानेश्‍वर जगनाडे, विशाल पांडुरंग शिंदे, विश्‍वजीत उदय राजोपाध्ये, संयोगिता मदन जगताप, आदित्य दत्तात्रय पवार, अविनाश दादासाहेब पवार, गायत्री निवृत्ती कदम, गिरिजाप्रसाद जनाप्पा घेरडे, इम्रान इक्बाल मोगल, ईश्‍वरी गोविंद शेळके, जयेश सतीश इंगळे, केतकी भास्कर देशपांडे, क्षिप्रा विद्याधर कुरणावळ, लक्ष्मी गुरुपादप्पा अळगी, नसरीन सलीम शेख, नितीन तानाजी गुजरे, ओंकार मुकुंद लाड, ओंकार महादेव यळसंगे, पल्लवी संजय माने, पवन संतोष वेदपाठक, राहुल इरन्ना सुतार, रेणुका नामदेव पाटील, ऋषिकेश ईश्‍वर चव्हाण, ऋषिकेश श्रीकृष्ण मोरे, सत्यजित बालाजी मुळे, शुभम बबन औसेकर, श्‍वेता शिवाजी मगर, सुजय पुरुषोत्तम गाटे, सुनील औदुंबर लेंडवे, सुप्रिया गोपीनाथ पवार, सूरज गणेश जाधव, सुरज हरिदास घावटे, सुयश शंकर अवताडे, योगेश महेश म्हंता, गायत्री राजेंद्र एकतपुरे, शंतनु रघुनाथ पाटील, शिवम सुनील साळुंखे, शुभम तारकेश्‍वर दोशी, स्नेहल पोपट दळवे, आकाश प्रसाद अजगर, आकाश संभाजी माने, अमोल धोंडीबा सूळ, चेतन मच्छिंद्र वाघमोडे, दीपक पांडुरंग शिंदे, गणेश शंकर तोडकर, हर्षल राजेंद्र नागटिळक, कन्हैया सुदर्शन वैरागकर, किरण विनायक हंबीरराव, मंथन मिलिंद दीक्षित, मोहम्मद आजम एजाज अहमद शेख, ओंकार संतोष पवार, योगेश कुमार पाटील, प्रतिक प्रवीण देशमुख, पृथ्वीराज सोमनाथ देशमुख, ऋषिकेश विद्याधर पाटील, सचिन अशोक क्षीरसागर, संतोष हनुमंत पाटील, सौरभ बंडू कडसरे, सौरभ चंद्रकांत चव्हाण, श्रेयश राजाराम चव्हाण, विवेक दशरथ रोंगे, युवराज विनोद शेलार व शुभम अर्जुन वाघमारे या 108 विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रु.3.5 ते 5.5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले  ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे 4 पैकी 3.46 सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व 4 पैकी 3.46 सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्‍वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close