राज्य

पंढरपूर तालुक्यात कोरोनाच्या चार रूग्णांची नोंद


पंढरपूर – गेल्या काही दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढत असून 1 एप्रिल 2023 च्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये एकूण सात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून यातील चार पंढरपूर तालुक्यातील आहेत. एक ग्रामीण भागात तर पंढरपूर शहरात तीन जणांची नोंद आहे. यातच येथे सध्या चैत्री यात्रा भरली आहे.
आजच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सात रूग्णांची नोंद असून यात चार पंढरपूर तर बार्शी, माळशिरस व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णांची नोंद आहे. सध्या ग्रामीणमधील एकूण 20 जणांवर उपचार सुरू आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 1 लाख 87 हजार 455 रूग्णांची नोंद असून 3 हजार 731 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. कोरोनाकाळात सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 36 हजार 905 इतके नोंदले गेले होते.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close