अकलूज, पंढरपूर व सोलापूरकरांसाठी बुलेट ट्रेनबाबत गुड न्यूज…
पंढरपूर – पुणे व सोलापूर जिल्ह्यातून धावण्याचा मार्ग असणार्या मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण वेगाने सुरू असतानाच मराठवाड्यातील नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्रेन मराठवाड्यातून नेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने सोलापूर जिल्ह्यातून नाराजी व्यक्त केली जात होती, मात्र आता या योजनेचे संचालक संतोष देसाई यांनी या बुलेट टे्रनचा मार्ग बदलला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
देशात राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाच्या अंतर्गत मुंबई- अहमदाबाद, मुंबई- नागपूर , नवी दिल्ली- वाराणसी व मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. मुंंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन ही महाराष्ट्र ,कर्नाटक व तेलंगाणातील अकरा रेल्वे स्टेशन असणारी व 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ट्रेन असणार आहे. यासाठी मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, जहीराबाद व हैद्राबाद असा मार्ग ठरविण्यात आला आहे. 711 किलोमीटर या मार्गाचे हवाई सर्व्हेक्षण देखील सुरू असून यातील तीनशे किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण असून अन्य काम ही वेगाने सुरू आहे. पावसाळा पाहता वातावरणातील बदलामुळे हवाई सर्व्हेक्षणात काही वेळा अडचणी येत असल्यातरी यावर वेगाने काम सुरू आहे.

मध्यंतरी या मार्गाचे सर्व्हेक्षण होत असताना काँगे्रसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन ही मराठवाड्यातून नेण्याची मागणी केली आहे. मुंबई- औरंगाबाद , जालना, नांदेड मार्गही गाडी धावावी असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे धरला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. या मागणीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मात्र नाराजीचा सूर उमटू लागला होता. चव्हाण यांनी याबाबतचे निवेदन ठाकरे यांना दिले होते.
दरम्यान हैद्राबाद- मुंबई बुलेट ट्रेनच्या योजनेचे संचालक संतोष देसाई यांनी स्पष्ट केले आहे की, या गाडीचा मार्ग केंद्रीय मंत्रालयाकडून ठरविला गेला असल्याने यात बदल करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. या बुलेट ट्रेनच्या सर्व्हेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. तीनशेहून अधिक किलोमीटरचा सर्व्हे झाला आहे व उर्वरित काम ही पूर्ण केले जात आहे.
आता या योजनेच्या संचालकांनीच बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याची शक्यता फेटाळल्याने ही या मार्गावरील गावांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी हा जिव्हाळ्याचा विषय असून अकलूज, पंढरपूर व सोलापूर ही शहर या मार्गावर असणार आहेत. यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.