कोरोना प्रभावित पंढरपूरसह पाच तालुक्यात स्वातंत्र्यदिनी फक्त तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीच ध्वजारोहण
सोलापूर – पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला व करमाळा या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने स्वातंत्र्यदिनी १५ आँगस्टला फक्त तालुक्याच्या मुख्यालयी एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे. या पाच तालुक्यात शुक्रवार १३ तारखेपासून निर्बंध कडक केले जात आहेत.
या पाच तालुक्यात मुख्यालयाच्या ठिकाणी विहित करण्यात आलेल्या वेळेत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, नगरपरिषद मुगख्याधिकारी, आमदार , खासदार,नगराध्यक्ष , पंचायत समिती गटविकास अधिकारी, सभापती यांना निमंत्रित करावे. अन्य मान्यवरांना निमंत्रण देवू नये असे कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन या पाच तालुक्यात साध्या पध्दतीने साजरा करण्याचे निर्देश देण्यात आहे आहेत.