सोलापूरचे सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन
सोलापूर – सोलापूर शहराचे सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे आज बुधवार ११ आँगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
सुहास भोसले हे सकाळी जिममध्ये व्यायामसाठी गेले असता त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ते हुशार व कर्तबगार अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. पत्रकारांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते.
एक चांगला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाबरोबरच सोलापूर शहरालाही धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुहास भोसले हे विभाग १ एक याठिकाणी विभागीय सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजूलाच त्यांचे हे कार्यालय होते. ते पाच महिन्यापूर्वी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी ते अमरावतीहून सोलापूरात बदलून आले होते.
मृत्यू समयी त्यांचे वय ५६ असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.