विशेष

अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणे अंतर्गत पंढरपूर शहरात १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी

पंढरपूर – भारत देशाची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूर शहरात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेसाठी १४० सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी रुपये रुपये पाच कोटी इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

पंढरपूर शहरामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कार्ययंत्रणा उभारणीच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक १२ सप्टेंबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखी तळ नेवासा क्षेत्रातील मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या सुधारित आराखड्यास नगर विकास विभाग खात्याने मंजुरी दिली आहे.

विठ्ठल मंदिर परिसरासाठी यात १० कोटीची तरतूद करण्यात आली. वारीप्रसंगी होणारी गर्दी, रहदारीचे नियम याकरिता पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यास अनुसरून या मागणीस हिरवा कंदील प्राप्त झाला आहे.

सी. सी. टी. व्ही. कॅमेरे संदर्भ शासन क्रमांक – २ नुसार ५ कोटीं रूपयांपेक्षा कमी असलेल्या किंमतीच्या प्रकल्पास माहिती व तंत्रज्ञान व गृहविभाग यांची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे , असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर प्रस्तावास गृह विभाग व माहिती आणि तंत्रज्ञान यांनी पंढरपूर शहरात ४ कोटी ९९ लाख रू. योजनेस मान्यता दिली आहे.

पंढरपूर शहरामध्ये आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्र एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांची होणारी गर्दी, रहदारीचे नियम, संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली वर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर निरीक्षण प्रणाली असणे गरजेचे असल्यामुळे आ. समाधान आवताडे यांनी नागरिकांचे सुरक्षित हितास प्राधान्य देऊन जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने वेळोवेळी पाठपुरावा करून या मागणीस यश प्राप्त केले आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close