विशेष

पंढरपूरमध्ये प्रशासनाच्या पुढाकाराने सोमवारी एकाच दिवशी 3581 चाचण्या, 128 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले


पंढरपूर दि.2 :- गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर व तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सतत वाढत असल्याने प्रशासनाने आता गावोगावी रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे कॅम्प भरविले असून यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतला आहे. यात सोमवारी दिवसभरात जवळपास 3600 चाचण्या झाल्या असून यात 128 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मागील काही दिवसात पंढरपूर तालुका पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कालच 152 रूग्ण येथे सापडले होते तर आजच्या अहवालानुसार शहरात 5 तर ग्रामीणमध्ये 52 अशा 57 जणांची नोंद आहे. या चाचण्या काल केलेल्या असतात. याचा अहवाल आज मिळाला. मात्र पंढरपूर प्रशासनाने शहरात व ग्रामीण  भागात अनेक ठिकाणी आज चाचण्या घेतल्या आहेत. यात तुंगत, कासेगाव, गादेगाव यासह वाखरी व अन्य गावांचा समावेश आहे. आज एकूण रॅपिड टेस्ट या 3527 तर आरटीपीसीआर 54 झत्तल्या आहेत. एकूण संख्या 3581 असून  यापैकी 128 जण पॉझिटिव्ह आहेत तर आजचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 3.57 टक्के असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आहेत .आजवर तालुक्यात कोरोनाचे 28 हजार 729 रूग्ण आढळून आले आहेत तर 539 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 799 जणांवर उपचार सुरू असून 27 हजार 391 जण बरे होवून घरी गेले आहेत.  

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close