Uncategorizedसामाजिक

तिसर्‍या टप्प्याचे निर्बंध कायम, सोलापूर जिल्हा ग्रामीणचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा वाढून 8.38% झाला..चिंताजनक

सोलापूर – सोालापूर जिल्हा ग्रामीणचा 29 जुलैचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा वाढून 8.38 टक्के झाला ऑक्सिजन बेडची अ‍ॅक्युपसी 15.43 टक्के असल्याने हा भाग तिसर्‍या टप्प्यात मोडत असल्याने निर्बंध शिथिलतेचे नियम जे 5 जून रोजी ठरवून देण्यात आले आहेत तसेच ठेवण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे.
यामुळे सर्व दुकाने सोमवार व शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंदचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

मागील आठवड्यात 29 जुलैचा जिल्हा ग्रामीण भागाचा ( सोलापूर महापालिका वगळून) हा पॉझिटिव्हिटी रेट या 8.38 टक्के असल्याने मागील प्रमाणचे या आठवड्याप्रमाणेच अनलॉकची स्थिती राहणार आहे. 5 जूनला राज्यात निर्बंध शिथिल करण्याची घोषणा झाली व यावेळी पाच स्तर निश्‍चित करण्यात आले होते. पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची अक्युपसी यावर हा स्तर निश्‍चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. त्यानुसार 7 जूनपासूनच सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये तिसर्‍या स्तराचे निर्णय लागू आहेत व ते आजही कायम आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही तालुक्यांमध्ये अद्यापही रूग्ण संख्या जास्त आहे. 

सोालापूर जिल्हा ग्रामीणचा 22 जुलैचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 5.02 टक्के होता व ऑक्सिजन बेडची अ‍ॅक्युपसी 12.16 टक्के होता मात्र यात आता वाढ झाली आहे हे चिंताजनक आहे. राज्यात 11 ,जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यात आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close