पावसाळ्यामुळे थांबलेले मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गाचे लीडार सर्व्हेक्षण आजपासून पुन्हा सुरू
पंढरपूर – बहुचर्चित मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असून याच्या विविध सर्व्हेक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. पावसाळ्यात थांबलेले लीडार सर्व्हे आता आज सोमवार 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होत असल्याची माहिती प्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी दिली.
या प्रकल्पाचे सर्वेक्षण पावसामुळे थांबले होते. पाऊस आणि वादळी वातावरणामुळे या यंत्रणेच्या कामात अनेक अडथळे येऊ लागल्याने ते सर्वेक्षण थांबविण्यात आले होते. सध्या हे सर्वेक्षण मुंबई आणि पुणे दरम्यान सुरू आहे. सोमवारपासून या सर्वेक्षणास पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. त्यानंतर हैदराबादपर्यंत सर्वेक्षण गतीने पूर्ण करून लवकरच डीपीआर सादर केला जाणार आहे.
मुंबई- हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जात असून या मार्गासाठी लीडार (हवाई सर्वेक्षण) मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या लीडार सर्वेक्षणास आजपासून सुरुवात सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली होती. ग्रामीण भागातील अक्कलकोटपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले होते.
सोलापूर जिल्ह्यातून धावणार्या मुंबई- हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम आता सुरू झाले असून विविध सर्व्हेक्षण यासाठी पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत जागा बाधितांची भूमिका जाणून घेण्यासाठी बैठकाही आयोजित करण्यात आल्या होत्या. बुलेट ट्रेन देशातील विविध भागातून धावाव्यात यासाठी केंद्रातील मोदी सरकारने हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून मार्ग निश्चित केले आहेत. यात मुंबई- हैद्राबाद या 650 किलोमीटर मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश असून मुंबई बीकेसी , ठाणे, पुणे ,सोलापूर, गुलबर्गा या भागातून ही बुलेट ट्रेन धावणार असून यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर यासह अक्कलकोट तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
यासाठी विविध सर्व्हेक्षण पार पडली असून नुकतेच सामाजिक सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले होते. ज्या जिल्ह्यातून ही रेल्वे धावणार आहे तेथील स्थानिक व संभाव्य बाधित लोकांशी चर्चा करण्याची प्रक्रिया ही राबविण्यात आली आहे.
ही बुलेट ट्रेन मुंबई, ठाणे, कामशेत, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा आणि हैद्राबाद या शहरांना जोडली जाणार असून यामुळे मुंबई, पुणे व हैद्रबाद या औद्योगिक व आयटी क्षेत्र असणार्या महानगरांबरोबरच मध्ये असणार्या अन्य लहान शहरांना याचा फायदा होईल. हा प्रकल्प राबविण्यासाठी सामाजिक, पर्यावरण सर्व्हेक्षण झाले आहे.