राज्य

युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनला जाण्याची खा. निंबाळकर यांची तयारी


फलटण दि. २६ : युक्रेन आणि रशियामधील सद्य युद्ध स्थितीमुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी तन – मन – धनाने काम करण्याची आपली इच्छा असून, यासाठी युद्धभूमीवर जाण्याचीही आपली तयारी आहे कसल्याचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार.. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान, केंद्रीय विदेश मंत्री यांच्याकडे केली आहे.
भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांना आपल्या देशात परत आणण्याच्या या उदात्त कार्यात सेवा रुपाने काम करण्याची संधी भारतीय शिष्टमंडळ सदस्य म्हणून आपल्याला देण्यात यावी. युक्रेनमध्ये पोहोचल्यानंतर देशातील या तरुण नागरिकांना मदत करण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करु. सरकारी अधिकारी आणि यंत्रणांना शक्य तितक्या सक्रियपणे मदत करण्याची आपली इच्छा आहे. देशाची सेवा करण्याची ही संधी जर आपल्याला दिली तर लोकप्रतिनिधी या नात्याने देशाची सेवा उत्तम करीन याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे.
सर्व भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून घटनास्थळी पोहोचल्यापासून तेथील शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करीत आपल्यासाठी देश प्रथम असल्याने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठविल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेश मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये परत आणण्याच्या या उदात्त कार्यात सेवा रुपाने काम करण्याची संधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागितली आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close