विशेष

नवरात्रात पंढरीत श्री रूक्मिणी संगीत महोत्सवाचे आयोजन, अनेक नामवंत कलाकार सेवा बजावणार


पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रात श्री रुक्मिणी संगीत महोत्सव सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,  कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून यात अनेक प्रसिध्द कलावंत सेवा बजावणार आहेत.
या संगीत महोत्सवाची सुरूवात 16 रोजी होत असून तो 21 ऑक्टोबरपर्यंत श्री संत तुकाराम भवन येथे रोज सायंकाळी 7:30 वा. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 रोजी ललीत मेऊंडी (हुबळी) आणि श्रीपाद लिंबेकर (नांदेड) यांचे  तीर्थ विठ्ठल हा संगीत कार्यक्रम होत असून  17 ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कला निकेतन कथ्थकरंग भुसावळ हे 40 कलाकारांच्या समवेत आपली कला सादर करतील. 18 रोजी प्रथम सत्रात पं.शौनक अभिषेकी (पुणे) यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग गायन होईल तर द्वितीय सत्रात ओम बोंगाणे यांचे गायन होणार आहे. 19 रोजी सत्यजीत तळवलकर (मुंबई)यांचे स्वतंत्र तबलावादन आणि ख्यातनाम  गायिका सायली तळवलकर (मुंबई)यांचे गायन, 20 ऑक्टोंबर रोजी ख्यातनाम गायक विनायक हेगडे (धारवाड)आणि ख्यातनाम गायिका सानिया पाटणकर (पुणे) यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. 21 रोजी इंडियन आयडॉल विजेती अंजली नंदिनी गायकवाड  (पुणे)यांचा बोलावा विठ्ठल हा कार्यक्रम होत असून 22 ऑक्टोबर रविवारी नटराज क्लासेस यांचे भरतनाट्यम आणि सुशील कुलकर्णी निर्मितमैफिल सप्तसुरांची हा स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाने नवरात्र संगीत महोत्सवाची सांगता  होणार आहे.
या संगीत कार्यक्रमात सुभाष कामत, आशय कुलकर्णी, प्रसाद करंबेळकर, ओंकार इंगवले, उदय कुलकर्णी, अंगद गायकवाड, यश खडके, स्वानंद कुलकर्णी, अक्षय तळेकर, विश्‍वेश्‍वर जोशी, वैभव जोशी, कौस्तुभ तळेकर, अथर्व देव, वैभव केंगार, सागर कोकतरे, ज्ञानेश्‍वर दुधाणे हे कलाकार साथसंगत करणार आहेत. पंढरपूरमधील कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्यावतीने करण्यातत आले आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close