विशेष

पंढरीतील परदेशी नगर अथवा गाताडे प्लॉट भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शहर पोलिसांनी पकडले

पंढरपूर – शहरातील परदेशी नगर किंवा गाताडे प्लॉट भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शहर पोलिसांनी अटक केली असून दोन चारचाकी वाहनांसह हत्यार व दरोड्यात उपयोगी पडणारे साहित्य हस्तगत केले आहे.

यातील एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळाला होता मात्र त्यास सापळा रचून पकडण्यात आले. संशयित आरोपी हे पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर व अनवली येथील आहेत. याबाबतची माहिती अशी की, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना काल २२ जुलै रोजी काही लोक दरोडा टाकण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोपाळपूर रस्त्यावर असणाऱ्या रिध्दीसिध्दी मंदिराजवळ काही तरुण चर्चा करत असल्याचे पाहिले. त्यांनी दोन कार जवळच उभ्या केल्या होत्या. या तरुणांना पोलिसाने घेरले व चौकशी करत असताना एकजण अंधाराचा फायदा घेवून पळाला. उर्वरित चार जणांना ताब्यात घेवून चौकशी केली करण्यात आली तसेच झडती घेतली असता दोन कोयते, कटावणी, वाय आकाराचा हूक तसेच मोबाईल व गाडीत दोन तलवारी आढळल्या.

या घटनेत सोमनाथ तानाजी बनसोडे वय ३२, बिरूदेव शिवाजी कोकरे वय ३५, शरद शिवाजी गांजाळे वय ३६ सर्व रा. अनवली, प्रवीण अशोक मेटकरी वय २५, संजय ज्ञानेश्वर गडदे वय २३ रा. गोपाळपूर यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर अधीक्षक अतुल झेंडे, उप अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कदम, गोसावी, बिपीन ढेरे, सूरज हेंबाडे, पठाण, शेख, महेश पवार, संजय गुटाळ, सुनील बनसोडे, सुजित जाधव,समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे यांनी केली.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close